बातम्या

घसा साफ करायला गेला आणि टुथब्रशच गिळला

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : एका युवकाने घसा साफ करताना टुथब्रश गिळल्याची घटना येथे नुकतीच घडली. एम्सच्या डॉक्टरांनी कोणतीही शस्त्रक्रिया न करता टुथब्रश बाहेर काढल्याने पुढील अनुचित प्रकार टळला.

एकाच्या सल्ल्यानुसार दिल्लीतील सीमापुरी भागात राहणारा अविद (वय 36) हा 8 डिसेंबर रोजी सकाळी टुथब्रशने घसा साफ करत होता. घसा साफ करत असताना 12 सेमी लांबीचा टुथब्रश घशाखाली गेला. परंतु, त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दुसऱ्या दिवशी त्याला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तेथेही त्याने काही सांगितले नाही. डॉक्टरांनी त्याला पेन किलर देत पोटदुखीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, औषधांचा काहीच परिणाम होत नव्हता, असे एम्सचे डॉ. प्रवीण अग्रवाल यांनी सांगितले.

डॉक्टरांनी छातीचा एक्स रे तसेच सीटी स्कॅन करुन पाहिले. पण यातून काहीच स्पष्ट होत नव्हते. मात्र, पोटाच्या सीटी स्कॅनमध्ये पोटात काही तरी अडकल्याचे उघड झाले. शेवटी डॉक्टरांनी अविदला याबाबत विचारले असता त्याने ब्रश गिळल्याचे मान्य केले. एम्समधील डॉक्टरांनी एन्डोस्कोपीद्वारे टूथब्रश बाहेर काढला आहे. नागरिकांनी टुथब्रश करताना काळजी घ्यायला हवी, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

WebTitle : marathi news youngster swallowed toothbrush while cleaning throat  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

Today's Marathi News Live : अजिंठा घाटात बस पलटी, सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

Priyanka Gandhi: राहुल गांधी पुन्हा 2 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात, प्रियंका गांधींसाठी काँग्रेसचा प्लॅन काय? बड्या नेत्याने दिली माहिती

Amruta Kulkarni: अमृताचे गाजलेले चित्रपट माहितीये आहेत का?

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

SCROLL FOR NEXT