बातम्या

''शरद पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी''- उद्धव ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

येवला : राज्यात युतीचे सरकार येणार पण तुम्ही आमच्याशी वागले तरी आम्ही सुडाने वागणार नाही. सूड-आसूड याचा फरक आम्हाला कळतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरुद्ध ईडी लढाई अजून बाकी आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे शरद पवार यांच्यावर टीका केली.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार संभाजी पवार यांच्या प्रचारार्थ येथे आज सायंकाळी झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. व्यासपीठावर खा. संजय राऊत, शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, किती दिवस पाटपाण्याचे प्रश्न लावून धरणार आहात. तुमच्या पुढच्या पिढीचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक असून, माझ्यासाठी नव्हे तुमच्या हक्कांचा आमदार निवडून द्यायचा आहे. एवढे एकत्र येऊन कर्तृत्व बजावत नसाल तर तुमचं तुम्ही ठरवा.

तसेच ते पुढे म्हणाले, माझ्या वचनानाम्याला मी बांधील असून, मी शपथ घेतली आहे. त्यातील प्रत्येक आश्वासन मी पूर्ण करणार आहे. तुम्हाला आनंदाचा काळ थकलेले नाही देणार तर युतीच देणार आहे. यांच्याकडे राहिलंय कोण? आता झोपलात तर उठवायला कोण नाही म्हणून गद्दाराला गाडत संभाजी पवार विधानसभेत पाठवा.

अजित पवारांचे रडणे म्हणजे तमाशा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गळे काढून रडले. पण हा तमाशा होता. पवारांचे रडणे म्हणजे त्यांच्या कर्माचे फळ असून चौकशीचा ससेमिरा मागे लागला म्हणून युतीच्या नावाने बोटे मोडताय पण आता न्यायाचे राज्य, चौकशीच होणारच आहे. 

पार्सल परत पाठवून द्या

इथं विकासाचा वचनानामा करावा लागला. मग इथला सत्तेतला आमदार काय करत होता. आता वेळ आली आहे, इथला पाहुणा निवडून देऊ नका. हे पार्सल परत पाठवून द्या. पण कुठेही पाठवा, मुंबईत पाठवू नका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेतला.

Web Title: Uddhav Thackeray Criticizes on Sharad Pawar and Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha 2019

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dummy Currency Notes | लोकसभा निवडणुकीत नकली नोटांची चलती? नकली नोटांचं रॅकेट उघडकीस!

Sanjay Raut: 'मौनी खासदारांचे समर्थन करणं मनसे प्रमुखांची मजबुरी...' संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Weight Loss : झटपट वजन कमी करायचंय? मग आहारात या पदार्थांचा नक्की समावेश करा, झिरो फिगर मिळेल

Bear Attack : तेंदू पत्ता संकलन करणाऱ्या इसमावर अस्वलाचा हल्ला; हल्ल्यात ६० वर्षीय इसम गंभीर जखमी

Pune Heat Wave: पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT