बातम्या

हिवाळी अधिवेशनात घोषणांची अंमलबजावणी ?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - ‘शेतकऱ्याला मदतीचा हात आणि भुकेल्याला अन्न’ या भूमिकेभोवती सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सरकारचा भर असणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची व्याप्ती आणि निकष बदलून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचणारी कर्जमाफी योजना जाहीर केली जाणार आहे. तसेच १० रुपयांत जेवणाच्या थाळीची घोषणा या अधिवेशन काळात करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कामाचा मुहूर्त करणार आहेत. 

महागाई आणि मंदीची झळ जनतेला भेडसावत असल्याने तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकार पाऊल उचलणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकरी आणि शहरातील दारिद्य्र रेषेखालील वर्गाला प्राधान्याने आधार द्यायचे ठरवले आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी फक्‍त सहा दिवसांचा असला तरी, या अधिवेशनात राज्य सरकार महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाकांक्षी योजना जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेनेन  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा आग्रह धरला आहे.

मात्र, सातबारा कोरा करण्याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. सातबारा कोरा करणे अशक्‍य असले तरी, लहान आणि मध्यम शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करता येऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या त्रुटी कमी करण्यावर काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीची योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी यापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: winter session development work muhurt
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mint Water: पुदिन्याचे पाणी प्या अन् आजारापासून दूर राहा

Food Poisoning: रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा.. ४० हून अधिक प्रवासी रुग्णालयात; नेमकं काय घडलं?

Sleeping Problem : झोपेच्या कमतरतेमुळे जडू शकतात गंभीर आजार, शांत झोप लागण्यासाठी हे उपाय करुन पाहा

Santosh Juvekar Post : संतोष जुवेकरचा फोटो थेट हेअर सलूनच्या बोर्डावर, अभिनेत्याने सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा

Dhananjay Munde News| राष्ट्रवादीने आबा पाटलांना मुख्यमंत्री का नाही केले? धनंजय मुंडे यांचा सवाल

SCROLL FOR NEXT