बातम्या

डिजिटल इंडियात 'BSNL' अजूनही 3G वरच अडकलं  

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम '3 जी' सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (BSNL) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने '4 जी' सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याची टीका 'मिशन राजीव' कॉंग्रेसने केली. 

बीएसएनएल च्या ग्राहकांसाठी तातडीने '4 जी' सेवा सुरू करावी या मागणीसाठी 'मिशन राजीव'च्या वतीने बाजीराव रस्त्यावरील 'बीएसएनएल' कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी "मिशन राजीव'चे संस्थापक व कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक शिवा मंत्री, शहर कॉग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब मारणे, पीएमटी कामगार संघ इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आदी उपस्थित होते. 

डिजिटल इंडियात '4 जी' सेवा नाही 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा मोठा गवगवा केला परंतु, मागील चार वर्षांपासून बीएसएनएल या सरकारी कंपनीची 4जी सेवा ते सुरू करू शकले नाहीत. डिजिटल इंडिया ही सरकारी कंपन्यांसाठी नसून केवळ खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे का? असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

SCROLL FOR NEXT