बातम्या

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार: मायावती

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्लीः उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका आज (मंगळवार) जाहीर केली आहे.

मायावती यांनी समाजवादी पार्टी सोबत युती तोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात सपा आणि बसपा परस्परांचे कट्टर विरोधक होते. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. पण मोदी लाटेत सपा-बसपा आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना मायावती म्हणाल्या, 'लोकसभा निवडणुकीतील उत्तर प्रदेशच्या निकालाकडे पाहिले तर समाजवादी पार्टीचा मुख्य मतदार असलेल्या यादव समाजाने पक्षाला साथ दिलेली नाही. सपाच्या बलाढय उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. आम्ही सपा बरोबर कायमस्वरुपी युती तोडलेली नाही. भविष्यात सपाचे प्रमुख अखिलेश यादव त्यांच्या राजकारणात यशस्वी झाले आहेत असे वाटले तर आम्ही पुन्हा एकत्र येऊ. पण ते यशस्वी झाले नाहीत तर स्वतंत्र लढण्यातच फायदा आहे. त्यामुळे पोटनिवडणूक आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.'


Web Title: Uttar Pradesh assembly elections will be fought on our own: Mayawati

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेश देशमुखची 'लय भारी...' फॅशन

SCROLL FOR NEXT