बातम्या

तुंबईत दोन BMC कर्मचाऱ्यांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत 3 दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसात 2 सफाई कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी बळी गेला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती. यावेळी भर पावसात आपलं कर्तव्य बजावत असतानाच या कर्मचाऱ्यांचा मृत्यू ओढावल्याच बोललं जातं असून मृत कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

विजयेंद्र सरदार बगडी (वय 36) आणि जगदीश बद्धा परमार्थ (वय 54) अशी या कामगारांची नावे आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने हे दोघे कर्मचारी गोरेगाव परिसरात कर्तव्यावर होते. जगदीश बद्धा परमार्थ हे गोरेगाव मधील सिद्धार्थ रुग्णालयाजवळ काम करत असतांना दुपारी 12:30 च्या दरम्यान त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते खाली कोसळले.लोकांनी त्यांना जवळच्या कपाडिया रुग्णालयात उपचारासाठी नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.तर विजयेंद्र सरदार बगडी हे सायंकाळी पाण्यातून वाहून जात असतांना लोकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून कांदिवलीतील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं. अश्या परिस्थितीत पालिकेकडून पर्जन्य जलवाहिन्या आणि घान कचरा व्यवस्थाप विभागातील कर्मचाऱ्यांना कामासाठी तैनात केलं जातं.अश्याच प्रकारे या दोघा कर्मचाऱ्यांना ही गोरेगाव परिसरात पाणी तुंबलेल्या जागी तैनात करण्यात आलं होतं .मात्र आपलं कर्तव्य बजावताना या दोघांचा मृत्यू झाल्याने या मृत कर्मचाऱ्यांना पालिकेकडून आर्थिक मदत करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात आली आहे.

WebTitle : marathi news two bmc worker lost lives in mumbai flood 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malshejh Ghat Accident News: माळशेज घाटात भीषण अपघात! दूध टँकर आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, तिघांचा मृत्यू

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई! अनेक गावातील अवस्था अत्यंत बिकट

Onion Price Hike: शेतकऱ्यांना अच्छे दिन! निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव वधारले; प्रतिक्विंटल मिळतोय इतका दर

Voter Awareness Programme: लोकशाहीचा महोत्सव! पालघरसह साता-यात बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदार जागृती, 100 टक्के मतदानाचा निर्धार

Today's Marathi News Live : सांगलीत सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

SCROLL FOR NEXT