बातम्या

'एक्झिट पोल'च्या अपप्रचारामुळे निराश होऊ नका. पक्षावर विश्वास ठेवा- राहुल गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या (गुरुवार) स्पष्ट होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसला कमी जागा मिळतील, असा अंदाज 'एक्झिट पोल'मधून व्यक्त केला जात आहे. मात्र, आता यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना ट्विटवरून आवाहन केले. खोट्या 'एक्झिट पोल'च्या अपप्रचारामुळे निराश होऊ नका. पक्षावर विश्वास ठेवा, असे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान रविवार (ता.19) पार पडले. त्यानंतर देशभरातील अनेक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांकडून 'एक्झिट पोल' जारी करण्यात आले. यामध्ये काँग्रेसला कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यावर आता ट्विटवरून राहुल गांधी यांनी सांगितले, की पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे सतर्क आणि दक्ष राहा. घाबरू नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या 'एक्झिट पोल'च्या अपप्रचारामुळे तुम्ही निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुमची मेहनत वाया जाणार नाहीत.

कांग्रेस पार्टी के प्रिय कार्यकर्ताओं ,

अगले 24 घंटे महत्वपूर्ण हैं। सतर्क और चौकन्ना रहें। डरे नहीं। आप सत्य के लिए लड़ रहे हैं । फर्जी एग्जिट पोल के दुष्प्रचार से निराश न हो। खुद पर और कांग्रेस पार्टी पर विश्वास रखें, आपकी मेहनत बेकार नहीं जाएगी।

जय हिन्द।

राहुल गांधी

— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2019

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही एका ऑडिओ मेसेजद्वारे कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले.

Web Title: Trust on Congress Party says Rahul Gandhi to Party Workers

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: नियमित एक लवंग खाल्ल्याने होतो जबरदस्त फायदा

Sangli Loksabha: सांगलीच्या खेळीचे 'खलनायक' जयंत पाटील... माजी आमदार विलासराव जगताप यांचा गंभीर आरोप; राऊतांवरही निशाणा

Nandurbar: नवापूर सीमा तपासणी नाक्यावर एसीबीचा छापा, दाेन शासकीय अधिका-यांसह एकास घेतलं ताब्यात

Vanchit Aaghadi Vs MIM : छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा MIM ला शह? राजकीय खेळीची जोरदार चर्चा

Sanjay Raut On Narendra Modi | "गादीपुढं मोदी कुणी नाहीत", संजय राऊतांचा मोदींवर निशाणा...

SCROLL FOR NEXT