Vanchit Aaghadi Vs MIM : छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा MIM ला शह? राजकीय खेळीची जोरदार चर्चा

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election: अफसर खान यांनी अपक्ष उमेदवारी भरल्याचं सुरुवातीला सांगितलं होतं.

छत्रपती संभाजीनगर : वंचितने अखेरच्या क्षणी मोठी राजकीय खेळी खेळल्याचं पाहायला मिळतंय. अकोल्यात वंचितने एमआयएमला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर आता वंचितने छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार दिल्यानं चर्चांना उधाण आलंय. अफसर खान यांनी अपक्ष उमेदवारी भरल्याचं सुरुवातीला सांगितलं होतं. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये अफसर खान यांना वंचितने उमेदवारी दिलीय. त्यांना एबी फॉर्मही देण्यात आल्याचं समोर आलंय. दरम्यान, अकोल्याची निवडणूक झाल्यानंतर वंचितच्या या खेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा रंगली आहे. अकोल्यात वंचितने एमआयएमला बिनशर्त पाठिंबा दिला होता. एमआयएमने कोणताही पाठिंबा मागितलेला नसतानाही वंचितने अकोल्यात एमआयएमला पाठिंबा देत असल्याचं जाहिर केलं होतं. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितने अफसर खान यांना एबी फॉर्म दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे या राजकीय खेळीवरुन चर्चांना उधाण आलंय. 2019 साली वंचित आणि एमआयएम एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोऱ्या गेल्या होत्या. मात्र यंदा एमआयएम आणि वंचित एकत्र नसून त्यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता छत्रपती संभाजीनगरमधील वंचितच्या खेळीनं राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आधीच तिरंगी लढत होणार आहेत. महायुतीकडून संदिपान भुमरे तर एमआयएमकडून इम्तियाज जलील निवडणूक लढवत आहेत. तर महाविकास आघाडीने पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. अशातच वंचितनेही उमेदवार दिल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com