बातम्या

आत्महत्येचा थरार! प्रेमासाठी लग्न, पैशांसाठी आत्महत्या

संजय डाफ

नागपूर : प्रेम त्यानं केलं आणि प्रेम तिनेही केलं. पण नियतीनं त्यांच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं. नागपूर रेल्वे स्थानकात असं काही घडलं, की सर्वांच्याच काळजाचाच थरकाप उडाला. 

नेहमीप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची लगबग सुरू होती आणि अचानक एकच गोंधळ सुरू झाला. एक तरूण एक्स्प्रेसच्या टपावर चढला. तो आत्महत्या करण्याची धमकी देत होता. लोक आरडाओरड करत होते. त्याला खाली उतरण्याची विनंती करत होते. पण हा तरूण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

शेवटी एका तरूणानं धाडस करून गाडीच्या टपावर उडी घेतली. तो या तरूणाला वाचवण्याचा प्रयत्न करणार तेव्हढ्यात त्यानं ओव्हरहेड वायरला हात लावला. अवघ्या काही सेकंदाचा खेळ. अखेर या तरूणानं मृत्य़ुला कवटाळलं.

मरण पावलेला तरूण छत्तीसगडचा असून काही दिवसांपूर्वीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. पती-पत्नी दोघंही नागपुरात पळून आले होते. पण पैसे नसल्यानं दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या तरूणाच्या पत्नीला वाचवण्यात यश आलंय. दोघांनी प्रेम तर केलं, पण नियतीच्या खेळासमोर संसाराचा एक चाक दुर्दैवीरित्या निखळलंय. 

प्रेम करुन छत्तीसगडहून पळून आलेल्या या दाम्पत्यासारखी अनेकजण असतील. सैराट होऊन नागपुरात आलेल्या या दाम्पत्याने जे केलं त्याने हळहळ व्यक्त होतेय. यातर तरुणाने आपलं आयुष्य संपलंय. पण आता प्रश्न उरलाय तर वाचलेल्या तरुणीचा. तिचं पुढे काय होईल? तिच्या घरातले तिला स्वीकारतील का? एकटीनं जगणं आता अधिक मुश्किल या तरुणीला जाईल. त्यातून पुन्हा ती आत्महत्येचं पाऊल उचलणार तर नाही ना, अशी शंका आता अस्वस्थ करतेय. 

Web Title - The thrill of suicide!  Marriage for love, suicide for money

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ebrahim Raisi : मोठी बातमी! इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

Loksabha Election 2024: अक्षय कुमार, जान्हवी कपूरसोबत अनेक सेलिब्रिंटीनी केलं मतदान, चाहत्यांनाही केलं आवाहन

Mumbai South Election Voting LIVE : महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सहकुटुंब केले मतदान

Lok Sabha Election Voting 2024: राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएम बंद, मतदानासाठी आलेल्या नागरिकांचा खोळंबा

Rahul Gandhi News | 8 वेळा मतदान केल्याचा तरुणाचा दावा, राहुल गांधींकडून Video Share

SCROLL FOR NEXT