बातम्या

स्टीफन हॉकिंग.. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि गॅलिलिओ!

टीम ई सकाळ

लंडन : खुर्चीवर खिळून राहिलेली ती स्टीफन हॉकिंग यांची छबी संपूर्ण जगभरात कौतुकाचा आणि आदराचा विषय होती.. असंख्य युवकांना प्रेरणा देणाऱ्या, 'ब्लॅक होल'सारख्या किचकट विषयामध्ये संशोधन करणाऱ्या हॉकिंग यांचा जन्म आणि मृत्यू या दोन्हींमध्ये विज्ञानविश्‍वाचा अनोखा योगायोग आहे. आधुनिक विज्ञानाचा पाया रचणारे शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या जन्मानंतर 300 वर्षांनी हॉकिंग यांचा जन्म झाला आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या 139 व्या जयंतीला त्यांचे निधन झाले. 

1988 मध्ये हॉकिंग यांनी 'अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम' हे पुस्तक प्रसिद्ध केले. अनपेक्षितरित्या जगभरात हे पुस्तक 'बेस्टसेलर' ठरले. विश्‍वातील गूढ वाटणाऱ्या गोष्टींची उकल करण्यासाठी हॉकिंग यांनी आयुष्यभर संशोधन केले. ऍस्ट्रॉफिजिक्‍ससारख्या एरवी सर्वसामान्यांना रुक्ष वाटणाऱ्या विषयात काम करत असूनही विद्वत्ता आणि हजरजबाबीपणा यामुळे हॉकिंग यांचे चाहते जगाच्या सर्व भागांत आणि सर्व थरांमध्ये होते. अनेकदा लोकप्रियतेमध्ये त्यांची तुलना सर आयझॅक न्यूटन आणि आईन्स्टाईन यांच्याशी होत असे. वयाच्या विशीत जडलेल्या एका व्याधीने हॉकिंग यांना आयुष्यभर व्हिलचेअरला खिळून बसावे लागले. तरीही 'ब्लॅक होल'चे गूढ उकलण्यासाठी त्यांनी संशोधन केले. 

'रोज मृत्यूच्या छायेत असूनही 49 वर्षे मी जगलो आहे. मी मृत्यूला घाबरत नाही; पण मला मरणाची घाईही नाही. या जगातून निघून जाण्यापूर्वी मला अनेक कामं करायची आहेत..' असे हॉकिंग यांनी 2011 मध्ये 'गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. 

डॉ. स्फ्टीफन हॉकिंग यांच्या निधनानंतर जगभरातील शास्त्रज्ञ, सेलिब्रेटी आणि सर्वसामान्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT