ST Bus
ST Bus 
बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात...

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या पाच विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात अचानक कपात करण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे कपात केलेले वेतन काहीच दिवसात मिळणार असल्याची नोटीस विभागातील सूचना फलकांवर लावण्यात आली आहे.

त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना प्रथमच नियमित वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. 

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या तुलनेत सिंधूदुर्ग विभाग 70 टक्के, त्याप्रमाणेच ठाणे 60 टक्के, सातारा 80 टक्के, अकोला 70 टक्के, रत्नागिरी 80 टक्केच वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्यातच उस्मानाबाद, गडचिरोली, नांदेड, नाशिक विभागातील प्रत्येक एक बस डेपोतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात झाली आहे. 

महामंडळाचा 500 कोटीचा संचित तोटा 5000 कोटींवर पोहचला आहे. गेल्या चार वर्षांत एसटीची एकही नवी एसटी रस्त्यावर आली नसून, शिवशाही प्रकल्पसुद्धा तोट्यात आहे. प्रवाशांना सुद्धा खिळखिळ्या एसटीचा प्रवास नकोसा वाटायला लागल्याने, एसटी प्रवाशांमध्ये घट झाली आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीत खडखडाट दिसून येत आहे. त्यात वेतन कपातीमुळे महामंडळ कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

एसटीच्या विलीनीकरणाची चर्चा 
महामंडळात पहिल्यांदात वेतनात कपात झाली आहे. नियोजनशुन्य कारभारामुळे एसटी महामंडळ तोट्यात गेले आहे. गेल्या चार वर्षात लालपरीची खरेदीच झालेली नाही. नफ्या तोट्याचा विचार न करता सरकारने एस टी महामंडळाचे विलीनीकरण शासनामध्ये करून सार्वजनिक वाहतूक बळकट करणे आवश्‍यक आहे. 

Web Title : ST Workers Salary Will  Deducte

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Tendulkar चा वेस्टर्न आऊटफिटमध्ये हटके अंदाज

Today's Marathi News Live : मी देखील विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात पावलं उचलणार; उज्वल निकम

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Ruchira Jadhav : मराठमोळा लूक अन् दाक्षिणात्य अंदाज, रुचिरा जाधवचं सुंदर फोटोशूट

Beed News: ताई तुम्ही रस्ता दिला, आता गाडीही द्या; महिलेची मागणी ऐकताच पंकजा मुंडेंनी थेट फोनच लावला

SCROLL FOR NEXT