बातम्या

पुरावे द्या; शिवसैनिकांना तात्काळ अटक करायला लावतो - दीपक केसरकर

सकाळ न्यूज नेटवर्क

नगर : केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर सात एप्रिल रोजी घटनास्थळी पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्माण करुन परिसरात नासधूस केल्याबद्दल शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह सहाशे शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधात पोलिसांकडे पुरावेच नाहीत. ते आणून देण्याचे काम करा, शिवसैनिकांना तात्काळ अटक करायला लावतो, अशी भूमिका गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. 

केडगावमधील पोटनिवडणुकीनंतर सात एप्रिल रोजी शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व त्यानंतर गळे चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर शिवसैनिकांनी तेथे धुडगुस घालत पोलिसांच्या कारवाईत अडथळे निर्माण केले.

त्यावरुन सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या गुन्ह्यातील एकाही आरोपीला अजून पोलिसांनी अटक केलेली नाही.

त्या संदर्भात पत्रकारांनी छेडले असता ते बोलत होते. गृहराज्यमंत्री केसरकर यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पोलिसांकडून तपासाबाबत माहिती घेतली. 

दरम्यान, आजही गुन्हा दाखल असलेले अनेक शिवसैनिक राजरोजपणे ठाकरे व केसरकर यांच्या दौऱ्यात पोलिसांसमोर उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SRPF जवानाची किरकाेळ कारणावरून निर्घृण हत्या; किरकोळ कारण, पण घडलं भयंकर

Gurucharan Singh Fees : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी गुरुचरण सिंह किती मानधन घ्यायचा ?

Today's Marathi News Live : खरी शिवसेना शिंदेंकडे; अमित शहांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख

MI vs KKR, IPL 2024: मुंबईसाठी 'करो या मरो' ची लढत! अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT