बातम्या

अरूण जेटली यांचं निधन

सकाळ न्यूज नेटवर्क

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं (आज) निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. जेटली यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. ९ ऑगस्टपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना जेटली यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते.

न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात आली होती. तसेच त्यापूर्वी त्यांचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. यापूर्वी जेटलींना कर्करोगाचेही निदान झाले होते. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये जाऊन उपचार घेतले होते. 

दुसऱ्या कार्यकाळात तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्या खांद्यावर अर्थमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली होती. परंतु त्यांच्यात्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता. शिवाय, ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रिपदासाठी विचार केला जाऊ नये, असेही ते म्हणाले होते

Web Title: Senior Bjp Leader Arun Jaitley Passes Away At Aiims Jud 87

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; अहवालातून माहिती समोर

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

Hingoli Water Crisis: हिंगोली जिल्ह्यात भीषण पाणीबाणी; 500 गावांत शासनाच्या योजना निष्क्रिय, पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Mumbai Market : मुंबईतील सर्वात स्वस्त कपड्यांचं मार्केट; स्टार्टींग रेंज फक्त २५० रुपये

SCROLL FOR NEXT