बातम्या

'मी कोणासोबत मिसळ खालेली नाही, तर मी पोहे खाल्ले होते' : शिवेंद्रराजे भोसले 

सकाळ न्यूज नेटवर्क

सातारा : ``आजपर्यंत मी विधानसभेच्या अनेक निवडणुका लढवल्या, पण कधीही मताधिक्याचा विचार केला नाही. मग मी आता मताधिक्याचा का विचार करू, असा प्रश्न उपस्थित करून साताऱ्यातील त्या हॉटेलची मिसळ चविष्ट आहे, म्हणून चर्चा आहे. मी कोणासोबत मिसळ खालेली नाही तर मी पोहे खाल्ले होते,`` अशा शब्दांत मिसळीच्या चर्चेला साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बगल दिली. 

सातारा-जावली विधानसभेच्या मतदारसंघातून  खासदार उदयनराजेंना विरोधी उमेदवारापेक्षा किती मताधिक्य मिळेल, या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजेनी हा  खुलासा केला.

सातार्‍यात  कै. अभयसिंहराजे भोसले यांच्या 75 व्या जयंती निमित्त सातारा महोत्सव 2019 चे आयोजन 5 ते 6 मे रोजी  केले आहे. त्या संदर्भात शिवेंद्रसिंहराजेंनी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 

लोकसभेच्या  मतदानानंतर प्रथमच शिवेंद्रसिंहराजे हे पत्रकार परिषदेला सामोरे गेले. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून उदयनराजेंना किती मताधिक्य मिळेल आणि लोकसभा निवडणुकीत मनोमिलन झाले असल्यामुळे आता सातारा नगर पालिकेतही मनोमिलन होणार का? मिसळीची चर्चा आजही सातार्‍यात खमंगपणे चर्चिली जात आहे, आदी  प्रश्‍न त्यांना विचारले गेले.

त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ``मी आजपर्यंत विधानसभा निवडणुका लढविल्या पण कधीही मताधिक्याचा विचार केला गेला नाही. तसेच लोकसभेला पक्षाने  उदयनराजेंना उमेदवारी दिली होती. शरद पवार यांचे आदेश मानून आम्ही लोकसभा निवडणुकीत व्यासपीठावर जावून उमेदवाराच्या प्रचाराचे काम केले आहे. त्यामुळे पालिकेत मनोमिलन झाले असा अर्थ कोणी काढू नये. तसेच साताऱ्यातील त्या हॉटेलची मिसळ चविष्ट आहे म्हणून चर्चा आहे. मी कोणासोबत मिसळ खालेली नाही तर मी पोहे खाल्ले होते,`` अशी टिप्पणी शिवेंद्रसिंहराजेंनी केली.

शिवेंद्रराजे यांनी शिवसेनेचे साताऱ्यातील लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत मिसळ खाल्ली होती. ती चर्चा अजून थांबलेली नसल्याने राजे यांना याबाबत विचारण्यात आले होते. 

Web Title : 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

Sambhajinagar News : उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगास नोटीस; १५ लाख स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मतदानाचा प्रश्न

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत हे लहान पक्ष सुद्धा ठरू शकतात 'गेम चेंजर'; कसे ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT