बातम्या

संगमनेरमध्ये आंदोलकांनी एसटी बस पेटवली 

सकाळ न्यूज नेटवर्क

तालुक्‍यातील वडगावपान जवळील टोल नाक्‍यावर रात्री पावणेबारा वाजता नाशिक-पंढरपूर एसटी बसला सहा ते सात युवकांनी अडवून पेटविले. चालक-वाहक व बसमधील प्रवाशांना उतरविल्यानंतर ही बस पेटविण्यात आली. यावेळी दगडफेक करुन एसटी बसच्या काचा फोडल्या. याप्रकरणी बस चालकाने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

रात्री पावणेबाराच्या सुमारास वडगावपान जवळील टोल नाक्‍याजवळ नाशिक-पंढरपूर बस आली. त्यावेळी तोंडाला फडके बांधून आलेल्या सहा ते सात युवकांनी बस अडविली. प्रवाशांसह सर्वांना उतरुन बसच्या मागील बाजूला ज्वलनशील पदार्थ टाकून बसला आग लावली. तसेच गाडीवर दगडफेक करुन काचा फोडल्या आणि घोषणाबाजी केली, असे चालक कमलाकर पंडीत कोळी (रा. नाशिक) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

Health Tips: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SCROLL FOR NEXT