बातम्या

Loksabha 2019 : वाराणसीतून न लढण्याचा प्रियांका यांचाच निर्णय

सकाळ न्यूज नेटवर्क

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध वाराणसी लोकसभा मतदारसंघातून न लढण्याचा निर्णय प्रियांका गांधी यांचा स्वतःचा होता, असे कॉंग्रेसचे नेते सॅम पित्रोडा यांनी आज सांगितले. वाराणसीत मोदींविरुद्ध प्रियांका गांधी उभ्या राहतील, अशी चर्चा होती. मात्र, अजय राय यांच्या उमेदवारीमुळे ती मावळली आहे. 

वाराणसीतून प्रियांका गांधी लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर, "प्रियांका यांनी लढतीतून गुपचूप माघार घेतली,' असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले होते. मात्र, न लढण्याचा निर्णय स्वतः प्रियांका यांचाच होता, असे पित्रोडा म्हणाले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या भगिनीला वाराणसीतून का उभे केले नाही, या पत्रकारांच्या प्रश्‍नावर पित्रोडा यांनी ही माहिती दिली. लढायचे की नाही, याचा अंतिम निर्णय प्रियांकांवर सोपविण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले.

प्रियांका यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे एका जागेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचे त्यांनी ठरवले, असा दावा पित्रोडा यांनी केला. प्रियांका गांधी या कॉंग्रेसच्या सरचिटणीसही आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

Health Tips: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SCROLL FOR NEXT