बातम्या

भाजपच्या वादग्रस्त उमेदवार साध्वी प्रज्ञा 44 हजार मतांनी आघाडीवर

सकाळ न्यूज नेटवर्क

लोकसभा निकाल 2019 : भोपाळ : ज्या उमेदवाराच्या वक्तव्यावरून देशभरात गदारोळ झाला आणि संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराचा रोखच बदलला, त्या साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांना धोबीपछाड दिला आहे. भोपाळमधून निवडणूक लढवित असलेल्या साध्वी प्रज्ञा यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर तब्बल 44 हजार मतांची आघाडी मिळविली आहे. 

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून साध्वी प्रज्ञा यांनी देशभरात खळबळ उडविली होती. साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी देत भाजप हिंदुत्त्वाचे कार्ड खेळत आहे असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर दिग्विजयसिंह यांनीही हिंदुत्त्वाचा मार्ग निवडला होता. 

'जनतेचा विश्‍वास भाजपवरच आहे. यंदाच्या निकालातून पुन्हा एकदा ते सिद्ध झाले आहे', अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञा यांनी व्यक्त केली. देशभरातही भाजपप्रणित एनडीएने तीनशेहून अधिक जागांवर आघाडी मिळविली आहे.
 

Web Title: Sadhvi Pragya on the way of win in Bhopal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT