बातम्या

रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्याची घटना; 24 जण मृत्युमुखी

सकाळ न्यूज नेटवर्क

रत्नागिरी -  राज्यात गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. चिपळूण जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले असून त्यात तब्बल 24 जण ठार झाले आहेत. त्यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली. 

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी दाखल झाले आहेत. त्यांनी या धरणाची पाहणी केली तसेच इथल्या गावकऱ्यांशी चर्चा देखील केली आहे

या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांची नावे -
अनंत हरिभाऊ चव्हाण (६३)
अनिता अनंत चव्हाण (५८)
रणजित अनंत चव्हाण (१५)
ऋतुजा अनंत चव्हाण (२५)
दूर्वा रणजित चव्हाण (दीड वर्ष)
आत्माराम धोंडू चव्हाण (७५)
लक्ष्मी आत्माराम चव्हाण (७२)
नंदाराम महादेव चव्हाण (६५)
पांडुरंग धोंडू चव्हाण (५०)
रवींद्र तुकाराम चव्हाण (५०)
रेश्मा रवींद्र चव्हाण (४५)
दशरथ रवींद्र चव्हाण (२०)
वैष्णवी रवींद्र चव्हाण (१८)
अनुसिया सीताराम चव्हाण (७०)
चंद्रभागा कृष्णा चव्हाण (७५)
बळीराम कृष्णा चव्हाण (५५)
शारदा बळीराम चव्हाण (४८)
संदेश विश्वास धाडवे (१८)
सुशील विश्वास धाडवे (४८)
रणजित काजवे (३०)
राकेश घाणेकर(३०)

दृष्टिक्षेपात

  • तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता.  
  • तिवरे धरणाची घटना कळताच इथले स्थानिक गावकरी मदतीला सर्वप्रथम धावून आले. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एनडीआरएफच्या दोन टीम तसंच पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थीळी दाखल. 
  • धरण फुटल्याने पुराच्या लोंढ्यात गुरे-ढोरेही पाण्यात गेली वाहून. 
  • नजीकचा दादर पूल पाण्याखाली गेला असून ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांना सतर्कतेचा इशारा. 
  • रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड व त्यांची टीम घटनास्थळी दाखल

Web Title: Ratnagiri Tiware dam has breached causing flood situation 24 dead in this incident

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

SCROLL FOR NEXT