बातम्या

पुण्यातील मिलिटरी इंजिनरीग कॉलेजमध्ये कोसळला पूल

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : मिलिटरी इंजिनरीगमध्ये अपघात झाला असून ट्रेंनिग सुरू असताना झालेल्या या अपघात 2 जवानांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. निर्माणाधिन असलेला पूल कोसळून या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत, असे समजते.

पुण्याच्या सीएमई (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) इथे ही घटना घडली आहे. जवानांची ब्रिज कंस्ट्रक्शन एक्सरसाइज (प्रशिक्षण) सुरु होती त्यावेळी हा पूल कोसळला, असे समजते.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (सीएमई) ही भारतीय लष्कराच्या कोअर ऑफ इंजिनियर्स ह्या शाखेची एक तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आहे. येथे भारतीय लष्करातील निवडक जवानांना यांत्रिकीचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण चालू असतानाच हा अपघात घडला आहे. मुंबई–पुणे महामार्गावर पुणे महानगरातील खडकी लष्कर तळाजवळ हे कॉलेज आहे. येथे केवळ लष्करी अधिकार्‍यांना व लष्करातील नागरी कर्मचार्‍यांनाच प्रवेश मिळतो.

Web Title: Two Indian Army soldiers died at College of Military Engineering in Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: व्यवहारात सतर्कता बाळगा, सावधगिरीने काम करा; जाणून घ्या तुमचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: मंगळवार तुमच्यासाठी काय घेऊन आलाय? वाचा राशिभविष्य

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT