बातम्या

पुण्यात घोरपडे पेठेत इमारतीचा भाग कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे :  शहरातील घोरपडे पेठेत रविवारी मध्यरात्री एका जुन्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात घोरपडे पेठेतील तीन मजली जुनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील काही भाग कोसळला. इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढले. इमारतीत वीस ते पंचवीस नागरिक राहत होते. तर तिसऱ्या मजलीवर सात ते आठ कुटुंब राहत होती. 

लाकूड आणि मातीचे जूने बांधकाम असलेली ही इमारत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आता ही उर्वरित धोकादायक इमारत पाडली जाणार आहे.

Web Title: old building in ghorpade peth collapsed in Pune

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला Sspms ग्राउंडवर होणार सभा

SCROLL FOR NEXT