बातम्या

साता-यातील अल्पवयीन मुलांनी केला कोयत्याने वार, तिघेजण जखमी 

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात खुनांच्या घटनांचे सत्र सुरू असतानाच गुन्हेगारांकडून दिवसाढवळ्या दहशत माजविण्याचा प्रकार सुरू आहे. पर्वती येथील जनता वसाहत आणि सातारा रस्त्यावर अल्पवयीन मुलांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता. 28) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

या प्रकरणी विशाल भोसले (वय 24, रा. पर्वती) या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यावरून दत्तवाडी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक देविदास घेवारे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल हा त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. त्यावेळी अमर गायकवाड आणि विकास कांबळे उर्फ थापा यांच्यात गेल्या डिसेंबर महिन्यात एकमेकांना बघण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा राग मनात धरून नऊ जणांच्या टोळक्‍याने हातात कोयते घेऊन विशाल आणि त्याच्या मित्रांना गाठले. या टोळक्‍यातील मुलांनी विशालच्या हातावर वार केला. त्यानंतर सातारा रस्त्यावर पाठलाग करून महेंद्र राजेंद्र नवले ( वय 21, रा. पर्वती दर्शन) आणि अक्षय दत्तात्रेय कुरधोनकर (वय 20, रा. महर्षीनगर) यांच्या पाठीवर आणि हातावर कोयत्याने वार केले.

Web Title: Minor children in Satara killed by accident, three injured

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती

Winter Season: हिवाळ्यात रोज गूळ खाल्ल्यास काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Rinku Rajguru: आर्चीला पाहून म्हणाल सैराट झालं जी...

Rahul Gandhi: राहुल गांधी हाजीर हो! पुणे न्यायालयाने बजावला समन्स, २ डिसेंबरला हजर राहण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

Dog Life: कुत्रा किती वर्षे जगतो?

SCROLL FOR NEXT