बातम्या

पुणेकरांचा हेल्मेटला नव्‍हे हेल्मेट सक्‍तीला विरोध

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - हेल्मेटला विरोध नाही, मात्र नागरिकांवर पोलिसांमार्फत सक्ती लादण्यास विरोध आहे, अशी भूमिका घेत हेल्मेटविरोधी कृती समितीने पालकमंत्री गिरीश बापट यांना रविवारी साकडे घातले. याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर देऊ आणि त्याबाबत पोलिसांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्‍वासन बापट यांनी दिले. 

शासकीय कर्मचाऱ्यांना १ डिसेंबरपासून, तर पुणेकरांवर १ जानेवारीपासून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर हेल्मेटविरोधी कृती समितीने सूर्यकांत पाठक यांच्या हस्ते पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे,  ‘‘महामार्गांवर हेल्मेटसक्ती समजू शकतो. परंतु, शहरातील रस्त्यांवर खड्डे आहेत. मेट्रोची कामे सुरू आहेत. तरीही सक्ती का ? मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे आदी कारणांमुळे अपघात होतात. त्याबाबत कारवाई करावी.’’ 

अंकुश काकडे, मोहनसिंग राजपाल, विवेक वेलणकर, शिवा मंत्री, संदीप खर्डेकर, बाळासाहेब रुणवाल, प्रदीप देशमुख, डॉ. शैलेश गुजर, इक्‍बाल शेख, पायल देवकर आदींनी बापट यांची भेट घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या सभेला राज ठाकरेंच्या सभेने प्रत्युत्तर..

Today's Marathi News Live : पुण्यात राहुल गांधींची सभा, ३ मे ला SSPMS ग्राउंडवर होणार सभा

SCROLL FOR NEXT