बातम्या

...म्हणून पेशवाई पगडीलाही आमचा विरोध - प्रकाश आंबेडकर 

सकाळ न्यूज नेटवर्क

पेशवाईला आमचा विरोध आहे म्हणून पेशवाई पगडीलाही आमचा विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महात्मा फुले यांची पगडी स्वीकारली त्याचा आनंद असल्याचे, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

पुण्यात आज (बुधवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांविषयी भाष्य केले. तसेच भाजपवर जोरदार टीका केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ''आगामी निवडणुकीपूर्वी भटक्या विमुक्तांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना करत महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. शेतकऱ्यांच्या परिषदा घेऊन निर्धार मूल्य, दुष्काळावर मात करणारी व्यवस्था याची मांडणी करण्यात येईल. केंद्र सरकार चुकीच्या भूमिका स्पष्ट करणार. आम्ही भाजप विरोधातल्या सगळ्या पक्षांना आवाहन करतो, जर आघाडी करायची असेल तर लोकसभेच्या 2 जागा धनगर, 2 जागा माळी, 2 जागा भटक्या विमुक्तांना देणार असतील तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत. शरद पवार यांनी फुलेंनी पगडी स्वीकारली त्याचा आनंद, आमचा विरोध पेशवाईला आहे त्यामुळे त्यांच्या पगडीला आहेच. शरद पवारांना आम्ही पुरोगामी समजतो, पण त्यांच्या काही भूमिका प्रतिगामी त्या त्यांनी सोडावाव्यात.''

महाराष्ट्रात काश्मीरसारखी स्थिती उद्भवू शकते. पुरोगामी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडीला आमची हरकत नाही, काही अटींवर एकत्र येऊ शकतो. संविधान बदलण्याचा आरएसएस भाजपचा अजेंडा आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT