बातम्या

शरद पवार पत्रकारावर नाराज | राजकारणात नातेगोते पाहात नाही - शरद पवार

सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर - माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या संभाव्य पक्षांतरावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार नाराज झालेत. राजकारणात नातेगोते पाहात नाही, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पद्मसिंह पाटील आपले नातेवाईक आहेत. तेही पक्षांतर करणार आहेत, अशा चर्चा आहे. या संदर्भात एका पत्रकाराने श्री. पवार यांना प्रश्न विचारला. पवार यांना प्रश्नाचा रोख आवडला नाही. नात्याचा संबंध काय, असे विचारत त्यांनी पत्रकार परिषदेतून उठून जाण्याची तयारी केली. काही ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकार परिषेद पूर्ण करण्याची विनंती पवार यांना केली. संबंधित पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्याची विनंती स्थानिक पत्रकारांनी केली. त्यानुसार, संबंधित पत्रकार बाहेर गेल्यावर पत्रकार परिषद पुन्हा सुरू झाली. 

त्या आधी राजकारणात नातेगोते पाहात नाही, पद्मसिंह मित्रही आहेत...', असे उत्तर पवार यांनी या प्रश्नावर दिले. 

श्री. पवार हे नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आहेत. गुरूवारी त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातील उपक्रमांची पाहणी केली. आज रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी ते श्रीरामपूरमध्ये आले आहेत.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वैशाली दरेकरांच्या रॅलीत विवेक खामकरांची दांडी, ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र', शिंदे गटाच्या वाटेवर?

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा! या १५ खेळाडूंना मिळालं स्थान

Today's Marathi News Live : मुंबईत आजही उष्णतेची लाट, नवी मुंबईचा पारा ४२ अंशांवर

Washim Temperature : एप्रिलअखेर वाशीम जिल्ह्यात तापमान ४० अंशाच्या पार!

Ice Water Facial : आईस वॉटर फेशियल करण्याची योग्य पद्धत

SCROLL FOR NEXT