PMC bank account holder woman's death.  
बातम्या

पीएमसी बँक खातेधारक महिलेची आत्महत्या, 4 दिवसात तिसरा मृत्यू

मोहिनी सोनार

मुंबई : पीएमसी बँके प्रकरणात आता तिसरा मृत्यू झाल्याचं समोर येतं आहे. पीएमसी बँकेत अडकलेले पैसे काढण्यासाठी खातेधारक खूप चिंतेत आहेत. त्यामुळे त्याच नैराश्यातून एके महिलेनेदेखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एमसी खातेधारक निवेदिता बिजलानी या डॉक्टर महिलेनं मंगळवारी आत्महत्या केली. अंधेरीतल्या राहत्या घरी झोपेच्या गोळा घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. याआधी पीएमसी खातेधारक संजय गुलाटी यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं सोमवारी मृत्यू झाला. तर मंगळवारी फतोमल पंजाबी यांचाही मृत्यू झाला होता. गुलाटी यांची तब्बल 90 लाखांची रक्कम पीएमसी बँकेत होती.. पीएमसी बँकेविरोधात मुंबईत किला कोर्टासमोर आयोजित केलेल्या रॅलीतही ते सहभागी झाले होते....मात्र, रॅलीनंतर ते घरी गेले आणि घरी हृदयक्रिया बंद पडून त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनांमुळे खातेधाराकांमध्ये आखणीनच घबराहट निर्माण झाली आहे. मात्र पुढे या खातेधारकांच्या पैशांचं काय होणार हा मोठा प्रश्न समोर आहे. त्यामुळे हे सर्व खातेधारक आपले पैसे मिळवण्यासाठी हवे ते प्रयत्न करताना दिसताय. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश येईल की नाही हे येणारा काळच सांगेल.

Web Title -  PMC bank account holder woman's death. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राजू शेट्टी यांची समजूत काढणार; हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य

Vehicle Insurance: वाहन विम्याच्या नियमांत मोठा बदल! १५ डिसेंबरपासून नवे नियम लागू; कार-बाईक मालकांना काय फायदा?

Building Collapse: दिल्लीत ३ मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

Health Tips : सफरचंद की केळं?आरोग्यासाठी कोणतं फळ ठरतं जास्त फायदेशीर, जाणून घ्या

Rahul Gandhi: गोकुळ दूध संघाच्या वादात उडी राहुल गांधींची उडी, भाजपवर केला बहुमत चोरीचा आरोप

SCROLL FOR NEXT