बातम्या

केरळसाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर केली 500 कोटींची तत्काळ मदत

सकाळ न्यूज नेटवर्क

केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पुरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळ दौरा केला. पंतप्रधानांनी हवाई पाहणी केली असून, त्यांनी केरळसाठी 500 कोटींची तत्काळ मदत जाहीर केली. 

केरळमधील पुरात आत्तापर्यंत 300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर कोट्यवधींचे नुकसान झाले. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमधील कोचीमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हवाई पाहणी करत पुरपरिस्थितीचा आढावा घेतला.

पंतप्रधान मोदी यांच्यासह केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल पी. सथासिवम आणि केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे. अल्फोन्सो यांनी हवाई पाहणी केली. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी दोन लाख तर यातील गंभीर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली. यापूर्वी 100 कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता 500 कोटींची मदत देण्यात येणार आहे.

दरम्यान, केरळच्या या पुरपरिस्थितीच्या बचावकार्यासाठी तिन्ही संरक्षण दले, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ)चे जवान दाखल झाले आहेत. राज्यात नौदलाच्या 42 तर लष्कराच्या 12 तुकड्या मदत व पुनर्वसनाचे काम करत आहेत.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nandurbar News | हिना गावित आणि गोवाल पाडवींमध्ये लढत

धैर्यशील मोहिते पाटील यांनी विश्वासघात केला - फडणवीस!

Lok Sabha Election: गुजरातनंतर मध्यप्रदेशातही घडला 'सूरत कांड', इंदूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार फितूर; उमेदवारी घेतली मागे

SCROLL FOR NEXT