बातम्या

परभणीत पेट्रोल 91.40 रुपये ; परभणी गाठणार सर्वात आधी 100 चा आकडा ?

सकाळ न्यूज नेटवर्क

परभणी : शेअर बाजारातील निर्देशांकाप्रमाणे परभणी जिल्ह्यात तेलाचे दर उसळी घेत असून त्यात दरदिवशी भरच पडत चालली आहे. त्या दराने मंगळवारी (ता.18) एक नवीन उच्चांक गाठीत पेट्रोल 91.40 रूपयांवर गेले. 

जिल्ह्यात पेट्रोलचा भडका कायम असून गत आठवड्यात पेट्रोलने नव्वदी पार केली होती. प्रामुख्याने गत मंगळवारी (ता.11) 90.29 रूपयांवर पेट्रोल होते. ते कमी होण्याऐवजी त्यात सातत्याने वाढ पाहवयास मिळाली. म्हणून सोमवारी (ता. 17) ग्राहकांना प्रती लिटरसाठी 91.17 रूपये मोजावे लागले. प्रेट्रोलप्रमाणे डिझेलचे दर ऐंशीच्या घरात जात आहेत.

मंगळवारी त्याचा दर 79.01 रूपये होता. मागील चार दिवसांत त्यात एका रूपयांची वाढ झाली. ऐवढे दर देशभरात कोठेही नाहीत. त्यामागे तेल डेपोचे अंतर परभणीपासून अधिक असल्याचे कारण पेट्रोलपंपचालकांनी समोर केले आहे. मात्र ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री पडत असून वाढत्या दराने जगात जर्मनी आणि भारतात परभणी, असे व्यंग समाजमाध्यमावर होत आहेत.

WebTitle : marathi news parabhani costliest petrol in Maharashtra fuel price hike 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT