बातम्या

भारताच्या हद्दीत घुसली पाकिस्तानी विमाने; टाकले बॉम्ब

सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर : भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आहे. 

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानची विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यांनी नौशेरा, पुँच, राजौरी येथे बॉम्ब फेकल्याचे सांगण्यात येत आहे. भारताकडून पाकिस्तानच्या विमानांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. एकूण तीन विमाने भारतीय हद्दीत आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघऩ केले आहे.

भारतीय हवाई दलाच्या 'मिराज' विमानांनी मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकिस्तानातील बालाकोट; तसेच व्याप्त काश्‍मीरमधील चाकोटी आणि मुझफ्फराबादमधील जैशे महंमद दहशतवादी संघटनेचे तळ उद्‌ध्वस्त केले होते. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बरोबर 11 दिवसांनी भारताने त्याचा सूड घेतला होता. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही बदला घेतला जाईल असे म्हटले होते. त्यानुसार, पाकिस्तानने ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

WebTitle : marathi news pakistani fighter planes entered indian territories  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक लोकसभेत मोठा ट्वीस्ट! शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून भरला उमेदवारी अर्ज

Video: Abhijeet Patil भाजपला मदत करणार? फडणवीसांच्या भेटीनंतरचं उत्तर चर्चेत!

Harsul Sawangi Road Accident: बाईकवरून तोल गेला अन् महिला खाली कोसळली; पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडलं

Shirur Loksabha Election: अमोल कोल्हे-आढळराव पाटील दोघेही एकमेकांच्या पडले पाया, पाहा व्हिडीओ

Local train bogie derailed at CSMT : मोठी बातमी! CSMT स्थानकात शिरताना लोकलचा डबा घसरला; हार्बर वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT