बातम्या

PoK मध्ये पाककडून युद्धाची तयारी; इम्रान खानला अणुयुद्धाची खुमखुमी 

पुण्याहून सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

पाकिस्तानचं डोकं ताळ्यावर आहे का असंच म्हणण्याची वेळ सध्या आलीय. कारण काश्मीरप्रश्नावर भरकटलेल्या पाकनं पुन्हा एकदा युद्धाची भाषा सुरू केलीय. दहशतवाद्यांच्या साथीनं भारतावर समुद्री हल्ला करण्याची तयारी पाकनं सुरू केलीय. यासाठी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिलं जात असल्याची धक्कादायक माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणाच्या हाती लागलीय. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही अण्विक युद्धाची भाषा बोलू लागलेत. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना इम्रान खान यांनी भारताविरोधात पोकळ धमकी दिलीय. 

प्रत्युत्तरादाखल भारतानेही आपण सज्ज असल्याचं म्हंटलंय. पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी आपणही सज्ज आहोत असा इशारा भारतीय लष्करानं दिलाय. भारत आणि पाकिस्तान आजवर जेव्हा जेव्हा आमने सामने आलेत तेव्हा भारतानं पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलंय. 

भारत आणि पाकिस्तान सर्वात आधी आमने सामने आले ते 1947 साली. काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकनं चढाई केली. मात्र भारतीय लष्करानं जशास तसं उत्तर देत पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावलं. 1965 मध्ये पाकनं भारताविरोधात पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्युत्तरादाखल भारतानं केलेल्या कारवाईत हजारो पाकिस्तान सैनिक मारले गेले. जवळपास 17 दिवस हे युद्ध सुरू होतं. 1971 साली भारत आणि पाकिस्तानमध्ये तिसरं युद्ध झालं. भारतानं पाकच्या 94000 सैनिकांना बंदी बनवलं. या युद्धातही पाकिस्तानला पराभवाची धूळ चाखावी लागली. 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्यानं कारगीलमध्ये घुसखरीचा प्रयत्न केला. मात्र तिथेही भारतानं पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं. 

आजवरच्या पराभवांमधून पाकिस्ताननं कोणताही धडा घेतलेला नाही. त्यामुळे पाकनं भारताविरोधात कितीही बेटकुळी फुगवली तरी त्यांची नांगी ठेचायला फारसा वेळ लागणार नाही हे नक्की.

Webtitle : marathi news pakistan starts war preparation against india due to kashmir and section 370 removal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

Hairstyle Ideas: स्वानंदीच्या या ९ हेअरस्टाईल तुम्ही करा ट्राय; प्रत्येक लूकवर दिसतील एकदम परफेक्ट

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT