बातम्या

चक्क कोरोनाग्रस्त चीनमधून आता कांद्यांची निर्यात...?

सकाळ न्यूज नेटवर्क

नाशिक : कोरोनाग्रस्त चीनमधून कांद्याची निर्यात करण्यासाठी "शीपमेंट' प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या आठवडाभरात बंदरांमधून व्यवहार खुले होतील, अशी माहिती कांदा निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. त्याचबरोबर सिंगापूर, मलेशियासाठी हॉलंड, ऑस्ट्रेलियामधून 49 रुपये किलो भावाने कांद्याची निर्यात केली जात आहे. दुसरीकडे मात्र मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पश्‍चिम बंगालमधून कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे आगार असलेल्या महाराष्ट्रात भाव कोसळू लागलेत. 

मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, पश्‍चिम बंगालमधील आवकमुळे कोसळले भाव 

कांद्याचा ढासळलेला भाव मध्यंतरी पूर्वपदावर येऊन सर्वसाधारणपणे 20 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री महाराष्ट्रामध्ये सुरू होती. आता मात्र राज्याच्या विविध भागात हाच भाव 12 ते 17 रुपयांपर्यंत ढासळला आहे. होळी सणासाठी उत्तर भारतामध्ये कांद्याची मागणी वाढते. याच पार्श्‍वभूमीवर खरेदी केलेल्या कांद्यासाठी चांगला भाव मिळाला. येत्या आठवडाभरात होळीसाठी कांदा पूर्णपणे रवाना झालेला असेल. मग मात्र कांद्याचे भाव टिकून राहतील की काय? याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह तयार झाले आहे. 

नाशिकमधून दीड लाख क्विंटल कांदा रवाना 
कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातून दिवसाला दीड लाख क्विंटल कांदा देशांतर्गत बाजारपेठेमध्ये दररोज विक्रीसाठी रवाना होत आहे. पाटणाकडे जिल्ह्यातून रेल्वेचे रोजचे 32 हजार क्विंटलचे दोन रॅकभर कांदा विक्रीसाठी जात आहे. उर्वरित कांदा ट्रकने व्यापारी पाठवत आहेत. अशातच, कर्नाटकमधून दक्षिणेतील राज्यात, पश्‍चिम बंगालमधून आसाम, बिहार, ओरिसा, झारखंडला, तर मध्य प्रदेशातून मध्य भारतातील राज्यात कांदा विक्रीसाठी जात आहे. 

कांद्याचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी निर्यात हा एकमेव पर्याय
चीनमधून 1 मार्चपासून कांद्याची निर्यात मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनामसाठी पूर्वपदावर येण्याची शक्‍यता आहे. हॉलंड, ऑस्ट्रेलियाचा कांदा विकला जात आहे. अशातच, निर्यातीखेरीज पर्याय नसलेल्या कांद्याचे कोसळणारे भाव रोखण्यासाठी निर्यात हा एकमेव पर्याय आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देशाच्या दौऱ्यावर असल्याने निर्यातीच्या दिशेने मंत्रालयात हालचाली होत नाहीत. ट्रम्प यांचा दौरा संपल्यानंतर कांदा निर्यातीचा निर्णय झाल्यावर कोसळणाऱ्या भावावर मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे. - विकास सिंह (कांदा निर्यातदार)  

Web Title: News about Onion exports from China Nashik marathi News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

SCROLL FOR NEXT