बातम्या

ONGC तील आगीचा मुंबईकरांना फटका; CNG पंपावर इंधन तुटवड्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई :  उरणमध्ये ओेएनजीसीच्या प्रकल्पाला आज सकाळी आग लागली आहे. सकाळी सात वाजता लागलेली ही आग जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आली आहे. उरुणमध्ये ओएनजीसीचा गॅस प्रोसेसिंग प्लँट आहे. त्याला सकाळी आग लागली होती. या आगीत गॅसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. मुंबई शहराला प्रमुख्याने याच प्लँटमधून सीएनजी आणि एलपीजी पुरवठा होतो. या आगीमुळे आता या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पण, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आगीत चौघांचा मृत्यू
उरणमधील ओएनजीसी प्रकल्पाच्या आगीत चार जाणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला आगीत तीन कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती होते. तर आग शवण्याच्या प्रयत्नात अग्नीशमन दलाच्या दोघा जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सीआयएएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात सीआयएएसएफच्या तीन जवानांचा समावेश आहे. आगीत काहीजण गंभीर जखमी झाले असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मुंबईच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम?
उरण नगरपालिकेसह जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी), पनवेल नगरपालिका यांच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचे लोण अनेक किलोमीटरवरूनही दिसत होते. त्यामुळे उरण शहरात काही काळ भीतीचे वातावरण होते. ओएनजीसी प्रकल्पापासून काही अंतरावर असलेल्या नागरी वस्तीतून नागरिकांना बाहेर काढण्यात आले होते. दरम्यान या आगीच झळ मुंबई आणि नवी मुंबई शहराला बसण्याची शक्यता आहे. ओएनजीसीच्या या प्रकल्पातूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबईला सीएनजी गॅस आणि एलपीजी पुरवठा होतो. शहारतील बहुतांश रिक्षा या सीएनजीवर धावत आहेत. तर, लोकसंख्येची घनता जास्त असल्याने एलपीजीची मागणीही मोठी आहे. ओएनजीसी प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे पुढचे काही दिवस सीएनजी आणि एलपीजीच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मुंबई आणि नवी मुंबईत सीएनजी आणि एलपीजी तुटवडा जाणवण्याची भीती आहे.

Web Title: ongc uran plant fire impact on mumbai navi mumbai gas supply

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Lok Sabha: 'मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून'; जालन्यात रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी

EPFO Rules : EPF अकाउंटवर मिळतो ५०,००० रुपयांचा फायदा; EPFO चा 'हा' नियम तुम्हाला माहितीच नसेल

Buldhana: पळशी झाशी गावात अघोरी विद्येचा प्रकार, पाणी पिण्यास ग्रामस्थांमध्ये भीती, नेमकं काय घडलं?

MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT