बातम्या

'आता पाकिस्तानशी केवळ POK वरच चर्चा' - राजनाथसिंह

सकाळ न्यूज नेटवर्क

काल्का (हरियाना) : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर ती जम्मू- काश्‍मीरवर नसेल तर ती पाकव्याप्त काश्‍मीरवर असे खडेबोल सुनावले आहेत. ते हरियानामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.

जम्मू काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आदळआपट करायला सुरवात केली आहे, पण आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील एकाही देशाने पाकच्या भूमिकेला समर्थन दिलेले नाही. 

राजनाथ म्हणाले की, "पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर ती केवळ पाकव्याप्त काश्‍मीरवर असेल भारताशी चर्चेला सुरवात करण्यापूर्वी पाकिस्तानने आधी दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे. आमचा शेजारी आता आंतरराष्ट्रीय समुदायाची दारे ठोठावत असून, भारताने चूक केल्याचा सूर आळवतो आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे, आम्हाला का धमकावले जात आहे, जगातील सर्वांत शक्तिशाली देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेनेही पाकिस्तानला धुडकावून लावत भारतासोबत चर्चा करा असे सुनावले आहे.

तसेच भारताला दहशतवादाच्या माध्यमातून अस्थिर आणि कमकुवत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे, असेही राजनाथसिंह म्हणाले. 

Web Title: Now discussion is only on Pak Occupied Kashmir says Rajnath Singh

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

Delhi School Bomb Threat: शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी प्रकरण, दिल्ली सरकारने शिक्षकांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

SCROLL FOR NEXT