बातम्या

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनने अधिकाऱयाला फेकले माशांच्या तलावात

सकाळ न्यूज नेटवर्क

प्योंगयोंग (उत्तर कोरिया) : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचे आपल्या एका जनरलला पिराना माशांच्या तलावात फेकून मृत्यूदंड दिला आहे, असे वृत्त ब्रिटनमधील 'डेली स्टार'ने दिले आहे. पिराना हा जगातील सर्वात हिंस्र मासा समजला जातो.

किम जोंग उन हुकुमशाह असून, अनेकांना मृत्युदंडाची शिक्षा दिली आहे. गेल्या आठवड्यातही अधिकाऱयाला मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. किम जोंग उनचे कारनामे जगाला हादरवून सोडणारे असतात. किम जोंग उनने प्योंगयोंगमधील आपल्या रॉन्गसॉन्ग या निवासस्थाळी एक मोठा तलाव बनवला आहे. या तलावात माणसांना आपल्या दातांनी जिवंत फाडून खाणाऱ्या पिराना माशांना पाळले आहे. जनरल आपल्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा संशय आल्याचे लक्षात येताच, किमने त्याचे हात आणि धड वेगळं केले आणि पिराना माशांच्या तलावात फेकले. मात्र, जनरलचा मृत्यू पिराना माशांच्या हल्ल्यात झाला की त्याआधीच, हे समजू शकलेले नाही. या जनरलचे नाव प्रकाशित केलेले नाही. किमच्या या क्रूरतेची चर्चा केवळ उत्तर कोरियातच नाही तर जगभरात होताना दिसत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबती बातचीत निष्फळ ठरल्याने किमने आपल्या अमेरिकन राजदूताला मृत्यूदंड दिला होता. किमने त्याच्या एका मंत्र्यालाही तोफेच्या तोंडी दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांना मृत्यूदंड देण्याचे वृत्त खोटेही ठरत आहे. किम जोंग उनने हे पिराना मासे ब्राझीलवरुन मागवले होते. पिरानाची हिंस्र मासा म्हणून ओळख आहे. या माशाचे दात एवढे तीक्ष्ण असतात की, अवघ्या काही सेकंदात हा मासा माणसाची चिरफाड करु शकतो. पिरानाच्या सुमारे 60 वेगवेगळ्या प्रजाती संपूर्ण जगभरात आढळतात.

ब्रिटेनच्या गुप्तचर विभागाच्या दाव्यानुसार, पिरानाने भरलेल्या तलावात फेकणे ही किमच्या क्रूर शिक्षांपैकी एक आहे. लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठी तो शत्रूंना अशी शिक्षा देतो. तो याचा वापर राजकीय दबावासाठी करतो. किम आपल्या कुटुंबातील लोकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भाषणादरम्यान टाळ्या न वाजवल्याने मारले आहे.

Web Title: North Korean general executed by being thrown into piranha filled fish tank

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: संजोग वाघेरे मावळमधील ठाकरे गटाचे उमेदवार, संजोग वाघेरेंना पोलिसांनी अडवलं

Rahul Gandhi Pune | संजोग वाघेरे यांना पोलिसांनी अडवलं, नेमका काय प्रकार?

Rohit Vemula: रोहित वेमुला मृ्त्यूप्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी हायकोर्टात सांगितलं आत्महत्येचं कारण

Prakash Ambedkar in Jalgaon : PM मोदी दिल्लीतील उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनाही भेटायला तयार नव्हते; प्रकाश आंबेडकरांची टीका

Abhijeet Bichukale News | अभिजीत बिचुकले यांनी यावेळी कल्याण मतदारसंघ का निवडला?

SCROLL FOR NEXT