बातम्या

चिखलफेक आणि शिवीगाळ प्रकरण; नीतेश राणे यांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ न्यूज नेटवर्क

आमदार नीतेश राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या 18 कार्यकर्त्यांना कणकवली न्यायालयाने नऊ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या सर्वांना 9 जुलै रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सर्वांवर महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की, चिखलाची अंघोळ आणि गडनदी पुलाला बांधून ठेवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तसेच काल सायंकाळी त्यांच्यासह 18 स्वाभिमान कार्यकर्त्यांना अटक केली होती. या सर्वांना आज दुपारी येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

आमदार नीतेश राणे यांना अटक केल्यानंतर प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना उपजिल्हा रूग्णालयात ठेवण्यात आले होते. दुपारी एक वाजता श्री. राणे यांना पोलिस कोठडीत आणण्यात आले. तर दुपारी साडे तीन वाजता त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. त्यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. तसेच पोलिस प्रशासनाच्यावतीने त्यांनी उपअभियंत्यांना मारण्यासाठी कट रचला गेला, अशी बाजू मांडली. हा कट कुठे रचण्यात आला. या कटासाठी वापरलेल्या गाड्या जप्त करावयाच्या आहेत. बादल्या जप्त करावयाच्या आहेत त्यामुळे सात दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे न्यायालयाला सांगितले. 

आमदार नीतेश राणे यांच्यावतीने अ‍ॅड. विलास परब, अ‍ॅड. संग्राम देसाई, अ‍ॅड. उमेश सावंत, अ‍ॅड. राजेंद्र रावराणे यांनी युक्तीवाद केला. या सर्वांनी आपल्या युक्तीवादामध्ये महामार्गावरील खड्डयांमुळे कणकवलीकरांचे जगणे मुश्कील झाले आहे. याला जबाबदार असणार्‍यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवे होते. त्याचा विचार कोण करणार, खड्डयांच्या समस्येमुळे कणकवलीकरांचा उद्रेक झाला. यात जे झालं तेच होणार होतं. या खटल्यातील आरोपी हे सामान्य नाहीत तर लोकप्रतिनिधी आहेत. हे सगळं रोजचं जगणं आम्ही अनुभवतो आहेत अशी बाजू मांडली. या  सुनावणीनंतर कणकवली न्यायालयाने आमदार नीतेश राणेंसह सर्व 18 जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड.गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Leone: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT