बातम्या

शेतकऱ्यांसाठी पुढील 5 दिवस धोक्याचे...राज्यात शनिवारपर्यंत अवकाळीचा अंदाज

साम टीव्ही

महाराष्ट्रात आणखी 34 कोरोना रुग्णांची भर पडलीय. यात सर्वात जास्त रुग्ण वाढेत ते पुण्यात. पुण्यात 23 रुग्ण वाढले असून मुंबई 6 तर मालेगावात 4 रुग्णांची भर पडलीय. तर ठाण्यात एक रुग्ण वाढलाय. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 हजार 236 इतकी झालीय. त्यातच आता एकमहत्वाची बातमी समोर येतेय.

 राज्यात शनिवारपर्यंत म्हणजेच येत्या २५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. बंगालचा उपसागर तसंच अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असून, परिणामी राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावतोय. दरम्यान, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आजपासून ते शनिवारपर्यंत पाचही दिवस दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे...तर 26 एप्रिलपासून म्हणजेच येत्या रविवारपासून राज्याच्या बहुतांश भागांतील वातावरण कोरडं राहील,अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवलीय.

कोरोनामुळे जगभरात थैमान घातलंय. अशात महाराष्ट्रातील सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत. शेती आणि शेती व्यवसायाला देखील कोरोनामुळे मोठं नुकसान सहन करावं लागलंय. अशात आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय.

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. अवकाळी पावसासह गारपीट देखील होऊ शकते असाही अंदाज मुंबईतील कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय. नुकताच भारतीय हवामान खात्याने यंदा देशात मान्सून चांगला राहील असा अंदाज वर्तवला. अशात आता पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी चिंतेचे असणार आहेत. 

मुंबईतील कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रतील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवलाय. कुलाबा वेधशाळेच्या माहितीप्रमाणे एप्रिल 21 ते एप्रिल 25 यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसू शकतो. महाराष्ट्रात तापमानाचा पार वाढतोय. महाराष्ट्रात तापमान आता ४० अंश सेल्सियस जवळ गेलंय.अशात मागील आठवड्यात देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये  वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला होता.

WEB TITLE - The next 5 days of danger for farmers ...

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane: मी सर्वात हुशार विद्यार्थी, अभ्यास करूनच पेपरला बसतो; नारायण राणे काय म्हणाले?

Viral Video Of Delhi Boy: वडील जग सोडून गेले, आईनेही वाऱ्यावर सोडले; १० वर्षांच्या जसप्रीतचा संघर्ष पाहून आनंद महिंद्रा मदतीला धावून आले

Cesar Luis Menotti Death: फुटबॉलच्या विश्वात कोसळला दु:खाचा डोंगर; फुटबॉल प्रशिक्षक रोमँटिक सेझर लुईस मेनोट्टीचं निधन

Live Breaking News : राजेंद्र गावित यांचा भाजप प्रवेश, पालघरमध्ये शिंदे गटाला धक्का

Rupali Chakankar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या आरोपावर चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT