बातम्या

Loksabha 2019 : रेल्वेकडून आचारसंहितेचा भंग, चहाच्या कपावर 'मै हू चौकीदार' ची घोषणा

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - रेल्वेकडून आचारसंहितेचा भंग झाल्याची दुसरी घटना उघडकीस आली आहे. "मैं भी चौकीदार' असे लिहिलेल्या कपातून चहा दिला जात असल्याची तक्रार काही प्रवाशांनी शुक्रवारी केली. 

कठगोदाम शताब्दीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाने चहाच्या कपाच्या छायाचित्रासह याबद्दल केलेले ट्विट व्हायरल झाले आहे. यावर बोलताना अशा कपांचा वापर थांबविला असून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली असल्याचे रेल्वेने सांगितले. "मैं भी चौकीदार' असे लिहिलेल्या कपांमधून दोन वेळा चहा देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ही जाहिरात "संकल्प फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने केली आहे. 

"या प्रकारणाची चौकशी केली आहे. यासाठी "आयआरसीटीसी'ची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचा खुलासा प्रवक्‍त्याने केला आहे. कर्तव्यात हयगय केल्याबद्दल पर्यवेक्षक व खानपान सेवेच्या प्रमुखांकडून स्पष्टीकरण मागविले आहे. खानपान सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड केला असून कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दोनच दिवसांपूर्वी तिकिटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून रेल्वेने आचारसंहितेचा भंग केल्याची घटना गाजली होती. अनवधनाने व दुर्लक्षामुळे ही चूक झाल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते.

Web Title: main bhi chaukidar on tea cup

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishal Patil हे भाजपची 'बी' टीम, Chandrahar Patil यांचा गंभीर आरोप

Sharayu Sonawane : साध्या सिंपल पारूचा वेस्टर्न अंदाज पाहिलात का ?

Today's Marathi News Live : लोकल ट्रेनमध्ये नशेखोर तरुणांच्या हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू

Hingoli News : निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला; महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राचार्यावर गुन्हा दाखल

Raashii Khanna : क्या खूब लगती है, बडी सुंदर दिखती हो...

SCROLL FOR NEXT