बातम्या

न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव; सिरीजमध्ये भारताकडे 2-0 ची आघाडी  

सकाळ न्यूज नेटवर्क

भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही तुफान फॉर्म राखत न्यूझीलंडचा 90 धावांनी पराभव केला. कुलदीप यादवच्या फिरकीचे कोडे किवींना आजही सोडवता आले नाही आणि त्यांचा डाव 40.2 षटकांतच संपुष्टात आला. 

नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीवीरांनी त्याचे सोने केले. नाबाद दीडशे धावांची भागीदारी रचली. मोठी धावसंख्या उभारण्याचे स्वप्न दिसू लागताच मात्र अवघ्या पाच षटकांच्या फरकाने दोघेही बाद झाले. कोहली आणि रायुडू अनुक्रमे 43 आणि 47 धावा करुन बाद झाले. त्यामुळे 350 धावा करणे अशक्य झाले. मात्र, अखेरच्या दोन षटकांत महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने 324 धावांची मजल मारली.

न्यूझीलंड 324 धावांचा पाठलाग करत असताना भुवनेश्वरने पुन्ही संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने सलामीवीर मार्टीन गुप्टिलला 15 धावावंर बाद केले. त्यानंतर मोहमंद शमी, युझवेंद्र चहल आणि केदार जाधव यांनी मिळून किवींचा अर्धा संघ माघारी पाठविला. 

21 व्या षटकात फलंदाजीला आलेल्या कुलहीपने मग धमाल उडवून दिली. त्याने आपल्या दुसऱ्या षटकापासून फलंदाजांना माघारी धाडण्यास सुरवात केली. 31 व्या षटकांत त्याने सलग दोन चेंडूंवर दोन फलंदाज बाद करत किवींचे कंबरडे मोडले. त्याने चौथ्या चेंडूवर हेन्री निकोल्सला बाद केले तर पाचव्या चेंडूवर ईश सोढीला आल्याआल्या माघारी पाठविले. अखेरच्या फलंदाजाला चहलने बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

Unseasonal rain : चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; चंद्रपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पूल गेला वाहून

SCROLL FOR NEXT