बातम्या

करोलबाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलला लागली भीषण आग, आगीत 17जणांचा मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्लीः मध्य दिल्लीमध्ये असलेल्या करोलबाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये आज (मंगळवार) पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे. चार तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

हॉटेलमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 26 गाडया व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चार तासानंतर आग आटोक्यात आली. 

हॉटेलमध्ये गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना आग लागल्याची माहिती समजल्यानंतर अनेकांनी घाबरून इमारतीवरून उड्या मारल्याने काही जण जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. परंतु, तात्काळ उपाय म्हणून हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्याने धुर बाहेर जाऊ शकला. मृत्यूमुखी पडलेल्या 17 जणांपैकी कांहीचा धुरामुळे गुदमुरून मृत्यू झाला आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱयाने दिली.

दरम्यान, अर्पित पॅलेस पाचमजली हॉटेल आहे. आग कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पुढील चौकशी करत आहेत.

Web Title: Fire at a hotel in Karol Bagh, nine people died

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT