बातम्या

नागपुरात कोसळधार ; पावसामुळे विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित

सकाळ न्यूज नेटवर्क

नागपूर : पावसाळी अधिवेशन अट्टहासाने नागपूरला घेतल्यानंतर आज पहिल्याच पावसात विधीमंडळाचे अधिवेशन स्थगित करावे लागले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे विधानभवनच्या पॉवर हाऊसमधे पाणी साचले आणि त्यामुऴे संपुर्ण वीज बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे अधिवेशन बंद करावे लागले.

पॉवर हाऊस मधे पाणी गेल्याने धोक्याचा इशारा म्हणून जनरेटर देखील सुरू करण्यास अधिकाऱ्यांनी मज्जाव केला त्यामुळे विधानभवनात येणारे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या ओळखपत्राची मोबाईलच्या बॅटरीमधून तपासणी करण्यात येत होती.

विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या निष्काळजीपणावर टिका केली. अजित पवार यांनी संताप व्यक्त करत कशाला केला होता अट्टहास ? मुहूर्तावर अधिवेशन घेतले तरी संकट टाळता आले नाही काय ? असा सवाल केला. नागपूर महापालिकेची चौकशी करा, अशी मागणी शिवसेना आमदाराने केली. विधानभवनाचे हे हाल तर महाराष्ट्राचे काय हाल असतील असा सवाल विरोधी आमदार सत्ताधारी आमदारांना विधानभवन आवारात विचारत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Idea : कमी खर्चात बर्ड थे पार्टीसाठी घर कसं सजवाल? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

Raj Thackeray: '5 वर्ष राणे मुख्यमंत्री असते तर...', तो किस्सा सांगत राज ठाकरेंनी केलं नारायण राणे यांचं कौतुक

RCB Vs GT : आरसीबीच्या बॉलर्ससमोर गुजरात ढेर; बेंगळुरूसमोर १४७ धावांच लक्ष्य

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT