बातम्या

आदित्य ठाकरे उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यावर आता शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकीतही कायम रहाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केल आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी युवासेना आक्रमक झाली आहे. आता तर थेट युवासेनेनं युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीच विधानसभा निवडणुक लढवावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे.

'हिच वेळ आहे...हिच संधी आहे. लक्ष- विधानसभा २०१९!!' 'महाराष्ट्र वाट पहातोय.' अशा शब्दात समर्थन केले आहे. ठाकरे कुटुंबीयांतील अद्याप एकानेही निवडणूक लढविलेली नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढण्याची जाहीर केले होते. पण, नंतर त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता.


 इन्स्टाग्रामवर युवासेना सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे बंधू वरूण सरदेसाई यांनी तशी मागणीच केली आहे. त्यांच्या या आग्रही मागणीला आदित्य ठाकरे कसा प्रतिसाद देताहेत ते हे आता पहावे लागेल. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील कुणी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्येही नवचैतन्य निर्माण होईल असा दावा केला जात आहे. 

Web Title: Yuvasena chief Aditya Thackeray likely contest assembly election in maharashtra

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

Khalistani Terrorist: हरदीपसिंह निज्जर हत्या प्रकरणात 3 संशयितांना अटक; कॅनडा पोलिसांची कारवाई, भारतावर गंभीर आरोप

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, मेषसह ४ राशींसाठी ‘शनिवार’ भाग्याचा; फक्त 'या' गोष्टीची घ्या काळजी

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

SCROLL FOR NEXT