बातम्या

नाटक चालू आहे, पण शांतता कुठंय?

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : एक चित्र डोळ्यांसमोर आणा! नाटक रंगात आलंय.. समोर काहीतरी इंटरेस्टिंग चालू आहे.. कलाकारांनी पूर्ण जीव ओतलाय.. त्या थिएटरमधल्या काळोखात बसलेले प्रेक्षक तल्लीन होत त्या नाटकाशी, पात्रांशी एकरूप झाले आहेत.. तेवढ्यात कुणाचा तरी फोन किंचाळतो आणि सगळ्यांची समाधी तुटते..

हा अनुभव कुणालाच नवा नसेल.. कारण, चित्रपट असो वा थिएटर सगळीकडे 'अत्यंत बिझी' कॅटेगरीतली माणसं जगावर उपकार केल्याच्या थाटात हजेरी लावत असतात. मग यांना फोन येतात.. आणि त्यांनाही त्याच वेळी अमेरिकेच्या शेअर बाजारापासून 'संध्याकाळी पप्याच्या गाड्यावर भेटू'पर्यंतच्या महत्त्वाच्या निरोपांची देवाण-घेवाण करायची असते. 'नाटकाचा/चित्रपटाचा आनंद घेणे' या क्षुल्लक कारणासाठी थिएटरमध्ये आलेल्या इतरांशी त्यांना काहीही घेणं-देणं नसतं..

अभिनेता सुमीत राघवनलाही याच अनुभवातून जावं लागलंय.. 'नॉक नॉक सेलिब्रेटी'चा एक प्रयोग सुरू होता. नाटक इन्टेन्स आहे.. दोन्ही कलाकार समरसून काम करतात.. अशावेळी थिएटरमध्ये फोन जोरात वाजला आणि सगळ्यांचाच रसभंग झाला.. वैतागलेल्या सुमीतने नाटकाचा प्रयोग थांबवला.. यावरून आता कलाविश्वात चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा थिएटरमधील मोबाईलच्या वापरावर निर्बंध आणण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.


 
Web Title: Sumeett Raghavan stopped ongoing play of knock knock celebrity

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT