बातम्या

VIDEO | शिवसेनेचा भाजपला 48 तासांचा अल्टिमेटम

सकाळ न्यूज नेटवर्क

भाजपकडून प्रतिसादासाठी पुढचे 48 तास शिवसेना वाट पाहणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. पुढच्या 48 तासात भाजपकडून प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' वापरणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. भाजप सोबत 50-50 च्या सूत्रावर पाणी फिरलं तर शिवसेनेकडे राष्ट्रवादी सोबत  हातमिळवणी करत सरकार स्थापन करण्याचा प्लान 'B' आहे. कॉंग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीला बाहेरून पाठींबा देण्यार अशी सूत्रांची माहिती आहे. 

यात आता शिवसेना आणि भाजपात संवाद बंद असल्याची शिवसेनेची भावना आहे. त्यामुळे येत्या 48 तासात जर भाजपकडून कोणताही प्रतिसाद आला नाही तर शिवसेना आपला प्लान 'B' चं रुपांतर प्लान 'A' मध्ये करू शकतो असं आता सूत्रांकडून समजतंय. 

युतीच्या राजकारणात मोठ्या भावाचं स्थान गमावलेली आणि मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक झालेली शिवसेना नवा घरोबा करण्याची शक्यताय. विशेष म्हणजे यासाठी 1995 चा फॉर्म्युला वापरण्यात येईल. मात्र पक्ष बदललेले असतील, असं बोललं जातंय.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काल दिल्लीत भेट घेतली. यानंतर महाराष्ट्रात नवी समीकरणं पाहायला मिळू शकतात, असं सूत्रांकडून समजतंय.  

काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद ?
राष्ट्रवादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करू शकते. या सरकारला काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा असेल. त्या बदल्यात काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद दिलं जाईल, असं राष्ट्रवादीच्या नेत्यानं म्हटलं. शिवसेनेनं भाजपासोबतची युती तोडल्यावरच याप्रकारे सत्ता स्थापन होईल, अशीही चर्चा झाल्याचं कळतंय. 


निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवस उलटलेत. तरी अद्यापही राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. विशेष म्हणजे महायुतीला मतदारांनी स्पष्ट कौल दिलेला असूनही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. महायुतीमधील कलह दिवसागणिक वाढतोय. अशातच आता नव्या समीकरणांचे संकेत मिळू लागलेत.

WebTitle : shivsena will activate their plan B fi they did not receive any communication from BJP


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT