बातम्या

शिवसेनेने पडणारा नेता नेला; आता आम्ही राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू - नवाब मलिक

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु शिवसेनेने पडणारा नेता नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू, असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी सचिन अहिर आणि शिवसेना यांच्यावर तोफ डागली.

सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला यांचे पक्षाला आणि नेत्यांना दु:ख झाले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून विश्वासघात होत असेल तर ती गोष्ट नक्कीच दु:ख करणारी आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. 

सचिन अहिर शिवसेनेत गेले असले तरी त्यांच्यासोबत वरळीतील एकही कार्यकर्ता गेलेला नाही हेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. पक्षाने 15 वर्ष मंत्रीपद आणि 15 वर्षे मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. परंतु मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असा आरोपही मलिक यांनी केला. 

सचिन अहिर शिवसेनेत गेले आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही नव्याने, ताकदीने पक्ष मुंबईत उभा करु आणि मुंबईत जास्तीत जास्त यश मिळवून देवू असा आत्मविश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

Web Title: NCP leader Nawab Malik reaction on Sachin Ahir enters Shivsena

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

Modi VS Pawar | राजकारणातील भटकती आत्मा कोण? मोदी-पवारांमध्ये जुंपली

Today's Marathi News Live : ठाण्याच्या जागेचा मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, प्रताप सरनाईक

Arvind Kejriwal: निवडणुकीपूर्वी केजरीवालांना अटक का? कोर्टाने ईडीला विचारले हे 5 प्रश्न

SCROLL FOR NEXT