बातम्या

मराठा तरूण-तरुणींची सरकारने फसवणूक केली - राज ठाकरे

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : आरक्षणावरून मुलांच्या भविष्याबाबत सरकार खेळ करत आहे. मराठा आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा. मराठा तरूण-तरुणींची सरकारने फसवणूक केली. खासगी क्षेत्रात आरक्षण नसल्याने सरकार या मुलांना कुठे नोकऱ्या देणार आहे. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज काय?, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

वैद्यकीय क्षेत्रातील आरक्षणाबाबत मराठा विद्यार्थ्यांकडून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. याविषयी बोलताना राज ठाकरे यांनी सरकारला जबाबदार धरले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर राज ठाकरे यांनी आज (सोमवार) प्रथमच पत्रकार परिषद घेत सरकारवर आरक्षण, दुष्काळ यासारख्या मुद्द्यावरून टीका केली. तसेच त्यांनी दुष्काळ दौरा करणाऱ्या मंत्र्यांना जाब विचारा असेही म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले, की दुष्काळासाठी राज्य सरकारने काय कामे केली. सरकारने काही कामे केली असती तर दुष्काळ का जाहीर केला. ठाण्यात आमच्या लोकांनी शेतकऱ्यांना व्यासपीठ मिळवून दिले. तर, ते भाजपवाल्यांकडून उधळून लावण्यात आले. शेतकऱ्यांचे भले होत होते, त्यात त्यांनी पक्षीय राजकारण आणले. आंबा विक्रीचा पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. देशात जी मुस्कटदाबी सुरु आहे, त्यावर साहित्यिकांनी बोललेच पाहिजे. चुकीच्या गोष्टी सुरु असतील त्यावर बोलणे गरजेचे आहे, मग सरकार कोणाचीही असो. आमचा पंतप्रधान सुज्ञ असावा अशी अपेक्षा होती. 

Web Title: MNS chief Raj Thackeray targets Maharashtra government on Maratha Reservation

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ulhasnagar Crime News : 2 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा; अखेर गुंड हितेंद्र ठाकूरला गुजरातमध्ये अटक

Maharashtra Rain Update: विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; घरांवरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली, पाहा VIDEO

Pat Cummins Statement: बॅक टू बॅक पराभवानंतर पॅट कमिन्स भडकला! पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

Today's Marathi News Live : हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

Elon Musk: भारत भेट रद्द केल्यानंतर मस्क पोहोचले चीनमध्ये, भेटीचं कारण काय?

SCROLL FOR NEXT