Uddhav Thackeray , Aditya Thackeray , Shivsena
Uddhav Thackeray , Aditya Thackeray , Shivsena 
बातम्या

VIDEO | अग्निपरीक्षेत पास! ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. अशा प्रकारे महाविकासआघाडीने आपले बहुमत विधानसभेत सिद्ध केले आहे. हा ठऱाव मांडत असताना विरोधी पक्ष भाजपने मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला. गोंधळ सुरु असतानाही ठाकरे सरकारच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. 169 मते ठाकरे यांच्या बाजूने पडली. तर 4 सदस्य तटस्थ राहिले. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे, असा प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. यास अनुमोदन नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील यांनी अनुमोदन दिले.  

भाजप आमदारांनी बहुमत सिद्ध करताना सभागृहातून सभात्याग करत महाविकास आघाडीच्या विरोधात घेषणाबाजी केली. बाहेर पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीवरून ठाकरे सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी प्रो-टेम स्पीकरवरून देखील कडाडून टीका केली.

भाजप सभागृहातून बाहेर पडण्या अगोदर  फडणवीस म्हणाले की, नियमित अध्यक्षांच्या निवडीपूर्वी विश्वासमत ठराव का? 170 आकडा तुमच्याकडे आहे तर मग भीती कसली? गुप्त मतदान झालं तर विश्वासमत मिळणार नाही, ही भीती होती, नियमबाह्य पद्धतीने हे सभागृह चालू आहे. त्यानंतर घोषणाबाजी करत भाजपचे सर्व सदस्य सभागृहाबाहेर पडले.

Web Title: Mahavikas aghadi win Floor test in Maharashtra Assembly

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: त्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा आरोप

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Haryana Politics: हरियाणात भाजपला मोठा धक्का, 3 अपक्ष आमदारांनी सोडली साथ; सरकार अल्पमतात येणार?

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

SCROLL FOR NEXT