बातम्या

VIDEO | 'खडसेंच्या मागण्या मान्य होतील'

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वक्तव्य केले. ''एकनाथ खडसे हे भाजपला सोडून जाण्याचा विचार कधीही करू शकत नाहीत. त्यांची नाराजी असेल तर ती लवकरच दूर होईल'', असे ते म्हणाले.

भाजपमधील नाराज एकनाथ खडसे यांच्या भेटीसाठी सुधीर मुनगंटीवार रवाना झाले आहेत. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, एकनाथ खडसे हे पक्षाचे आधारस्तंभ आहेत. पक्ष सोडून जाण्याचा त्यांचा विचारही नसेल. ते आमचे नेते आहेत. त्यांनी पक्षासाठी आपले आयुष्य समर्पित केले. जर त्यांच्यात मनात याबाबत काही नाराजी असेल तर त्यांची नाराजी दूर होईल. भाजप सोडण्याचा विचार ते करू शकतच नाही. त्यांच्या नावातच एकनाथ आहे म्हणजे एकच पक्ष. 

सरकारची वाटचाल ही वाट लावणारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सरकारवर टीका केली. आत्ताच्या सरकारची वाटचाल ही वाट लावणारी आहे.

Web Title: Eknath Khadse will never leave BJP says Sudhir Mungantiwar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : लातूर जिल्ह्यात उद्या 54 केंद्रावर 25 हजार विद्यार्थी देणार नीट(NIT)ची परीक्षा

Pune News: पुणेकरांच्या सुरक्षेसाठी चिमुकली उतरली रस्त्यावर! हृदयस्पर्शी संदेशातून करतेय हेल्मेट वापरण्याचं आवाहन; सुंदर VIDEO

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : प्रत्येकाच्या तोंडून बाळासाहेबांची वाक्य शोभून दिसतील असं बिलकुल नाही, केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Narayan Rane News : दोन्ही ठाकरेंमधून कोण श्रेष्ठ? नारायण राणेंनी सांगितला मनातला 'राज'

RCB Vs GT : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू- गुजरात टायटन्स भिडणार; आकडेवारी प्रत्येकाला थोडी चक्रावूनच टाकणारी!

SCROLL FOR NEXT