बातम्या

डब्बेवाल्यांसाठी मोनो,मेट्रोमध्ये वेगळा डब्बा असावा - सुभाष तळेकर

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत मेट्रो, मोनोमुळे प्रवाशांसाठी चांगली सोय झाली. मात्र मेट्रो आणि मोनोमधून प्रवास करण्यास डबेवाल्यांना प्रवेश नाही. त्यामुळे डबेवाल्यांनाही मोनो आणि मेट्रोमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील ज्या नोकरदारांना आम्ही डबा देतो, ते मेट्रो-मोनोने जातात. मात्र, त्यांचा डबा पोहचविणारे डबेवाले मेट्रो-मोनोतून प्रवास करू शकत नाही. त्यामुळे डबेवाल्यांनाही यातून प्रवास करू द्यावा, अशी मागणी तळेकर यांनी केली आहे. याबाबत मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे एमएमआरडीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोनो आणि मेट्रोमधून कामगारांना, कष्टकऱ्यांना थोडे फार सामान घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, अथवा मोनो, मेट्रोला लहानसा सामान वाहून नेणारा डबा जोडावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. 
- सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोसिएशन.


Web Title: mumbai dabewale demands for entry in mono and metro railway

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SRPF जवानाची किरकाेळ कारणावरून निर्घृण हत्या; किरकोळ कारण, पण घडलं भयंकर

Gurucharan Singh Fees : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’साठी गुरुचरण सिंह किती मानधन घ्यायचा ?

Today's Marathi News Live : खरी शिवसेना शिंदेंकडे; अमित शहांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख

MI vs KKR, IPL 2024: मुंबईसाठी 'करो या मरो' ची लढत! अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT