बातम्या

भाजपमध्ये बाहेरून आलेल्या चेहऱ्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात बाहेरून आलेल्यांना पायघड्या, तर निष्ठावानांना 'गाजर' असे चित्र भाजपमध्ये निर्माण झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनसुबा आहे. मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपमध्ये बाहेरून आलेल्या चेहऱ्यांचीच मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे. 

माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. असे असले तरीही विखे यांचा मंत्रिमडळ प्रवेश नक्‍की मानला जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना देखील मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार असल्याचे चर्चा आहे. याचबरोबर मूळचे "राष्ट्रवादी'चे असलेले मात्र सध्या भाजपचे आमदार झालेले पुणे जिल्ह्यातील लक्ष्मण जगताप यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. 

बीडमधील ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी "राष्ट्रवादी'तून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना पायघड्या अंथरल्या जातात, मात्र निष्ठावानांना "गाजर' दिले जाते, असे चित्र पाहायला मिळते आहे.

Web Title: cabinet expansion in Maharashtra BJP chance to rebel leaders

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT