बातम्या

'राज साहब आपका भाषण हम कोलकता मे सूनते है, आपका भाषण हमे खूब भालो लगता है'

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : 'राज साहब, आपका भाषण हम कोलकता मे सूनते है, आपका भाषण हमे खूब भालो लगता है,' अशा प्रतिक्रिया राज ठाकरे यांना कोलकात्यात ऐकायला मिळाल्या. यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत असणारे त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ही अवाक झाले. 'मराठी माणूस' केंद्रस्थानी ठेऊन राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांची परराज्यात ही 'क्रेज' असल्याने सर्वच अवाक झाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवस कोलकाता दौऱ्यावर होते. त्यांना भेटण्यासाठी आणि पाहण्यासाठी कोलकातावासीयांनी गर्दी केली होती. कोलकात्यातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार यांचा समावेश होता. राज ठाकरे यांनीही या लोकांना वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत या लोकांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. राज ठाकरे यांच्यासोबत सेल्फी आणि फोटो काढण्यासाठी ही अनेकांनी गर्दी केली होती.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची राज ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीत ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका राज यांनी स्पष्ट केली.ईव्हीएम विरोधात आपण लवकरच महाराष्ट्रात आंदोलन करणार असून या आंदोलनात उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ममता यांना केलं आहे. याचबरोबर विरोधकांच्या ईव्हीएम विरोधातील आंदोलनात सहभागी होण्याची विनंती देखील राज ठाकरे यांनी केली आहे.

Web Title: Bangali citizens likes Raj Thackeray speeches
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane Vs Uddhav Thackeray: 'मातोश्री'ची सर्व हिस्ट्री माझ्याकडे, तोंड उघडायला लावू नका! नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा, Video

Today's Marathi News Live : मुंबई उत्तरसाठी तेजस्वी घोसाळकर यांचा काँग्रेसकडून लढण्यास नकार?

India Vs Bangladesh: टीम इंडियाची विजयी सलामी! बांगलादेशवर ४४ धावांनी शानदार विजय

Today's Gold Silver Rate : लग्नसराईत ग्राहकांना दिलासा! सोन्याच्या भावात घसरण, चांदीची चकाकी उतरली; जाणून घ्या मुंबईसह इतर शहरातील दर

Devendra Fadnavis: रामराम भारतात नाही तर मग पाकिस्तानात जाऊन करायचा का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

SCROLL FOR NEXT