बातम्या

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरूनच उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा आणि अभिनंदनही केलं. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाला देखील शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शिवसेनेकडून अधिकृत पाठवण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून  शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, अनेक दिग्गज व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राज्यभरातून एक लाख शिवसैनिक, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.

Web Title: Uddhav Thackeray send invitation to Narendra Modi for oath taking ceremony

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who Is KL Sharma: काँग्रेसचे निष्ठावान, सोनिया गांधींचे विश्वासू.. अमेठीतून स्मृती इराणींना टक्कर देणारे के. एल शर्मा कोण?

Naach Ga Ghuma Collection : 'नाच गं घुमा'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई; दोन दिवसांतच जमावला कोट्यवधींचा गल्ला

Petrol Diesel Rate 3rd May 2024: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात स्वस्त झालं की महागलं

Today's Marathi News Live : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आईही मैदनात

Avinash Jadhav: मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणीचा गुन्हा; सराफा व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT